मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वितित्र अपघात झाला आहे. या अपघातात 11 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. अनेक वाहनं एकमेकांना धडकली आहे. एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, अनेक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.
ट्रक आणि अनेक कार यांची जोरदार धडक झाली आहे.पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकने 11 वाहनांना ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला, बोरघाट रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहे. बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
जवळपास 7 ते 8 गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत.
या अपघातांमध्ये गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे
या अपघातात काहीजण जखमी असल्याची माहिती आहे. अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे