लोकप्रिय आणि तितकाच विवादित रिऍलिटी शो 'बिग बॉस'चा सोळावा सीजन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचा सध्या तिसरा आठवडा सुरु झाला आहे. गेली दोन आठवडे शोमध्ये अनेक वादविवाद, राडे, मैत्री, प्रेम सर्वकाही पाहायला मिळालं आहे. बिग बॉसने सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.
बिग बॉस 16 मध्ये अनेक सेलिब्रेटी स्पर्धक सहभागी झाले आहेत. शोमध्ये पहिलं एलिमिनेशनसुद्धा झालं आहे. यामध्ये 'उतरन' फेम श्रीजीता डे घराबाहेर गेली आहे. दरम्यान उरलेल्या स्पर्धकांमध्ये टिकून राहण्यासाठी चढाओढ सुरु आहे.
प्रत्येक स्पर्धक आपापल्या बाजूने उत्तम खेळ खेळत आहेत. यामध्ये काही स्पर्धक अतिशय दमदार खेळताना दिसून येत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता गौतम सिंग वीज होय. गौतम हा दुसऱ्या आठवड्यात घरातील कॅप्टनसुद्धा बनला होता.
सध्या शोमध्ये गौतम सह-स्पर्धक अभिनेत्री सौंदर्या शर्माच्या प्रेमात पडला आहे. या दोघांमध्ये जवळीकता वाढत आहे. सोबतच सौंदर्याबाबत शालिन आणि गौतम यांच्यामध्ये वादविवाददेखील पाहायला मिळत आहेत.
परंतु अनेक लोकांना माहिती नसेल की गौतमचं यापूर्वी लग्न झालेलं आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या बहिणीसोबत गौतम वीजने लग्नगाठ बांधली होती. परंतु काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.
गौतम वीजने 'बिग बॉस' आणि 'सपने सुहाने लडकपणके' फेम अभिनेता अंकित गेराची बहिण ऋचा गेरासोबत लग्न केलं होतं. या दोघांनी 2013 मध्ये लग्न केलं होतं..
गौतम आणि ऋचा लग्नाच्या तब्बल ७ वर्षानंतर म्हणजेच 2020 मध्ये घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत गौतमने सांगितलं होतं की, सध्या तो सिंगल आहे. त्याचा घटस्फोट झाला आहे.
बिग बॉसमध्ये गौतमने कधीच आपल्या खाजगी आयुष्याबाबत भाष्य केलेलं नाहीय. आता या शोमध्ये तो सौंदर्याच्या प्रेमात पडला आहे. हे नातं आता पुढे कसं जाणार? दोघांची लव्ह स्टोरी सुरु होणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.