भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसमुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील केला जातो आहे. हॉटेल्स-रेस्टॉरंट्सही काही अटींसह उघडले जात आहे. जगातील काही देशांमधील हॉटेल्सनी ग्राहकांनी सोशल डिटन्सिंग राखण्यासाठी आपल्या हॉटेल्समध्ये बदल केलेत. ग्राहकांच्या सुरक्षेसह हॉटेल्सनी ग्राहकांना आकर्षित वाटेल अशी व्यवस्था केली आहे. (फोटो-एपी)
नेदरलँडच्या अँमस्टरडॅममधील मेडिकामॅटिक रेस्टॉरंटमध्ये अशा पद्धतीचं ग्लासहाऊस (Mediamatic restaurant) उभारण्यात आलेत. (फोटो-एपी)
हे ग्लासहाऊस तयार करताना सोशल डिस्टन्सिंगती पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. मोजकीच लोकं आत बसतील अशी जागा या ग्लासहाऊसमध्ये आहे. त्यांच्यामध्येही आवश्यक तितके अंतर राखलं जातं आहे. (फोटो-एपी)
या ग्लासहाऊसमध्ये बसलेल्या ग्राहकांना फेस शिल्ड घातलेले कर्मचारी फूड सर्व्ह करतील. (फोटो-एपी)
पॅरिससमधील एका रेस्टॉरंटमध्ये टेबलवर एखाद्या लॅम्पप्रमाणे प्लास्टिक शिल्ड टांगण्यात आलेत. (फोटो-एपी)
दोन व्यक्ती जेव्हा समोरासमोर बसतील तेव्हा त्यांच्यासमोर हे प्लास्टिक शिल्ड असेल. (फोटो-एपी)
फ्रेंच डिझायनर ख्रिस्तोफे जर्निजॉन यांनी स्वत: या प्लास्टिक शिल्डचं डेमोनस्ट्रेशन दिलं आहे. (फोटो-एपी)
अमेरिकेच्या व्हर्जिनियातील इन अ लिटल वॉशिंग्टन या रेस्टॉरंटमध्ये काही खुर्च्यांवर पुतळे बसवण्यात आलेत. जेणेकरून दोन व्यक्ती जवळजवळ बसणार नाहीत. (फोटो-एपी)