अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळपास दीड महिना उलटल्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. सुरुवातीला बॉलिवूडमधील नेपोटिझमवरून हा वाद सुरू होता मात्र आता या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप लावण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना सुशांतचे वडील कृष्णा सिंह यांनी बिहार पोलिसात एफआयआर दाखल केली आणि रियावर गंभीर आरोप लावले. सुशांतला वेडं ठरवून त्याचा पैसा लुटायचा रियाचा होता डाव, रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याचा अकाऊंटमधून कोट्यवधी रुपये गायब केले, त्याच्या महत्त्वाच्या वस्तू, आवश्यक कागदपत्रे बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्याला सातत्याने धमकी दिली असंही ते म्हणाले.
सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आणि त्याचा जुना स्टाफ मेंबर असणाऱ्याने बिहार पोलिसांना सांगितलं, रिया सुशांतचा फोन चेक करायची आणि तो स्वत:च्या मर्जीने काही करू शकत नव्हता.
सुशांतची बहिण मितू सिंहने रिया सुशांतच्या फ्लॅटवर ब्लॅक मॅजिक करायची असं सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नोकराने तिल्या सांगितल्याचं म्हणाली. . ही बाब मितूला सुशांत सिंहच्या घरी काम करणाऱ्या नोकराने सांगितली होती. सुशांतच्या आत्महत्येच्या 2 दिवसांपूर्वीसुशांत-रियामध्ये भांडण देखील झाले होतं, असं मितूने सांगितलं.
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिताने सत्याचा विजय होतो असं सूचक ट्वीट केलं होतं. यानंतर तिनं पहिल्यांदाच मौन सोडलं आणि रियावर सुशांतचा छळ केल्याचा आरोप केला. सुशांतने आपल्याला मेसेज करून रिया आपला छळ करत असल्याचं सांगितलं, तो तिच्यासोबतच्या रिलेशनशिपला त्रस्त झाला होता आणि त्याला हे नातं संपवायचं होतं, असंही सांगितल्याचं अंकिता म्हणाली. सुशांत आणि आपला मोबाइलवरील संवादही तिनं पोलिसांना दाखवला आहे.
सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुशांतला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे. सुशांतच्या कुटुंबाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.