महिलेला तिच्या प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्यानंतर, 125 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढून तिने न्यायाची मागणी केली आहे.
हिमाचल प्रदेशमधील सिरमौर जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आपल्या प्रियकराकडून धोका मिळाल्यानंतर, महिलेचा पाण्याच्या टाकीवर चढून 'शोले' स्टाईल स्टंट...
सुधा पूलाजवळील शिवमंदिरजवळ राहणाऱ्या एका युवकाच्या संपर्कात ही महिला होती.
त्यानंतर, या महिलेने आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून, त्या युवकासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
पण आता महिला त्या युवकापासून वेगळी राहत असून, युवकाने तिच्यासोबत मारहाण केल्याचा आरोपही तिने केला आहे.
व्हिडीओमध्ये महिला, मरणाशिवाय कोणताही पर्याय नसून, यासाठी तो युवक जबाबदार असल्याचं सांगत आहे.
डीएसपी साहिब वीर बहादुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या सांगण्यानुसार, तक्रार दाखल करण्यात आली असून युवकाला अटक करण्यात आला आहे.