NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / पावसाळ्यात त्वचाविकार बळावण्याचा धोका; अशी घ्या त्वचेची काळजी

पावसाळ्यात त्वचाविकार बळावण्याचा धोका; अशी घ्या त्वचेची काळजी

पावसाळा म्हटलं की इतर आजारांप्रमाणे त्वचेच्या समस्याही आल्याच.

113

कडक उन्हाच्या झळामुळे अंगाची लाहीलाही झाल्यानंतर सर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस आता सुरू झाला आहे. पण पावसाळा ऋतू म्हटलं की, आजारपण आलंच. त्याचप्रमाणे पावसाळ्यात जाणवणाऱ्या सतत ओलाव्यामुळे काहींना त्वचेच्या तक्रारीही सहन कराव्या लागतात.

213

पावसाच्या पाण्यात सतत राहिल्याने, पाय ओले राहिल्याने त्वचेला खाज उठणे, त्वचा लाल पडणे किंवा त्वचा फाटणे अशा समस्या उद्भवतात.

313

पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मधुलिका म्हात्रे यांनी काही टीप्स दिल्यात.

413

घरातील कुंड्यांमध्ये झाडे ठेवण्याचे टाळा, कारण यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

513

पाळीव प्राण्यांच्या जवळ जास्त जाणे टाळा.

613

आपली त्वचा हायड्रेट करा. यासाठी अंघोळीनंतर एक चांगले मॉइश्चरायझिंग क्रिम लावा, यामुळे आपल्या संवेदनशील त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार होतो आणि त्वचेला खाज येत नाही.

713

आपल्या रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी निरोगी संतुलित आहार घ्या.

813

जास्त वेळ ओले कपडे परिधान करू नका. सैल कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

913

ओल्या चपला वापरू नयेत, यामुळे पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो.

1013

बाहेरून आल्यावर लगेच आंघोळ करा.  विशेषत: आंघोळ केल्यावर तुम्ही आपले शरीर पूर्णपणे कोरडे करून घ्या.

1113

हातापायाची नखे कापावीत, त्यात माती अडकल्याने जंतुसंसर्ग होऊ शकतो.

1213

जर तुम्हाला गंभीर पुरळ उठत असेल तर लवकरात लवकर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण तुम्हाला तोंडावाटे अलर्जीविरोधी औषधांची आवश्यकता असू शकते.

1313

पावसाळ्यात त्वचेची समस्या जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये किंवा औषध विक्रेत्यांकडून कुठल्याही प्रकारची क्रिम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावणे टाळा. कारण, अनेक क्रिममध्ये स्टेरॉइड्स असल्याने त्वचेची समस्या वाढू शकते. 

  • FIRST PUBLISHED :