जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा भारतात प्रादुर्भाव वाढला आहे. भारतात आतापर्यंत 834 रुग्णांची वाढ झाली आहे. शासकीय स्तरावर बचावकार्य सुरू असताना आता भारतीय वायू दलानेही यात सहभाग घेतला आहे.
गोव्यामध्ये भारतीय वायू दल मदतीला धावून आले आहे. गोव्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे.
या रुग्णांची चाचणी करण्यात आली परंतु, याचे नमुने तपासण्याची सुविधा गोव्यात नाही. त्यामुळे हे नमुने पुण्यातील नायडू रुग्णालयात नेण्यात येत आहे.
भारतीय वायू दलाचे जवान एअरक्राफ्टने कोरोनाबाधितांचे नमुने पुण्यात घेऊन येतात.
याआधी देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात वायू दलाकडून मदतकार्य सुरू आहे.