सार्स कोव-2 (SARS CoV-2) सातत्याने आपलं रूप बदलतो आहे. कोरोना हा स्पाइक प्रोटिनमार्फत मानवी पेशीत प्रवेश करतो. त्यामुळे या स्पाइक प्रोटिनच्या आधारावर लस तयार केली जाते आहे, त्याच स्पाइक प्रोटिनचा आकार बदलण्याची क्षमता व्हायरसमध्ये आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार काटेदार स्पाइक प्रोटिन स्वत:ला वाकवू शकता आणि एका हेअरपिनसारखा कठोर आकार घेतो. सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलच्या डॉ. बिंग चेन आणि त्यांच्या टीमने क्रायोजनिक इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास केला. मानवी पेशीत घुसण्यापूर्वी आणि मानवी पेशीत घुसल्यानंतर व्हायरसचा आकार कसा होतो हे तपासलं.
मानवी पेशीशी जुडल्यानंतर स्पाइक प्रोटिन हेअरपिनसारखा आकार घेतो. हा बदल तो पेशीशी जोडण्यापूर्वीदेखील करू शकतो, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.
डॉ. चेन यांनी सांगितलं की हा नवा आकार व्हायरसच्या प्रोटिनला तुटण्यापासून वाचवू शकतो. याच आकारामुळे व्हायरस पृष्ठभागावर भरपूर वेळ राहत असावा आणि मानवी शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीपासूनही वाचत असावा, असी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
हा आकार अँटिबॉडीला चकवा देऊ शकतो ज्यामुळे तो व्हायरला निष्क्रिय करू शकणार नाही. आकार बदलण्यापूर्वी आणि आकार बदलल्यानंतर ग्लायकॅन्स नावाचे अणू या प्रोटिनमध्ये पसरलेले असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक प्रणालीला माहिती होत नाही.
सध्या ज्या लशी तयार केल्या जात आहेत त्या स्पाइक प्रोटिनचा विचार करून रोगप्रतिकारक प्रणाली सक्रिय करणाऱ्या आहेत. मात्र व्हायरसचा आकार बदलल्याने लशीचा प्रभावही कमी होऊ शकतो, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.
स्पाइक प्रोटिन स्थिर राहिलं नाही असंच बदलत राहिलं तर अँटिबॉडी तर निर्माण होतील मात्र व्हायरसला रोखण्यात प्रभावी ठरणार नाही, असं शास्त्रज्ञ म्हणालेत. आता या नव्या आकारानुसार लशीला अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेनंही संशोधकांचं काम सुरू आहे.