कोरोना काळात हॉटेल्स खुली झालीत. मात्र आवश्यक ती पुरेपूर खबरदारी घेतली आहे. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता याबाबत काळजी घेतली जात आहे. याशिवाय काही हॉटेलमध्ये आणखी एक बदल दिसून येईल तो म्हणजे खाद्यपदार्थांमध्ये.
आता हा पाहा मास्क पराठा. मदुराईतील टेम्पल सिंटी या प्रसिद्ध रेस्टॉरंटने हा मास्क पराठा तयार केला आहे. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क महत्त्वाचा आहे आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा मास्कसारखा पराठा तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा असा संदेश या निमित्ताने दिला जातो आहे.
याच हॉटेलमध्ये हा कोरोना डोसाही तयार करण्यात आला आहे. सामान्यपणे गोल आकाराच्या असलेल्या या डोशाला कोरोनाचा आकार देण्यात आला आहे. (Image - Twitter)
अशाच पद्धतीने दक्षिण भारतातीलच एक पदार्थ बोंडा. ज्याला कोरोनाव्हायरससारखा आकार देण्यात आला आहे. बोंडा हा गोल असतो मात्र या कोरोना बोंड्यावर कोरोनासारखे स्पाइक आहेत. हा बोंडादेखील मदुराईतील हॉटेलमध्ये उपलब्ध आहे. (Image - Twitter)
कोलकात्यातील एका मिठाईच्या दुकानात कोरोना केक आणि कोरोना संदेश ही प्रसिद्ध बंगाली मिठाई दिसून येईल. कोरोनाबाबत जनजागृतीसाठी अशी मिठाई तयार करण्यात आली आहे.
तर व्हिएतनामध्ये कोरोना बर्गर तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये सामान्य बर्गरप्रमाणेच सामग्री वापरली होती. मात्र बर्गरसाठी वापरण्यात येणाऱ्या बनचा आकार कोरोनासारखा ठेवण्यात आला. (Image: AP)