NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / हिंदू प्रियकर अन् मुस्लीम प्रेयसी, आईवडिलांनी लग्नाला विरोध केल्यानंतर मंदिराबाहेरच झालं शुभमंगल!

हिंदू प्रियकर अन् मुस्लीम प्रेयसी, आईवडिलांनी लग्नाला विरोध केल्यानंतर मंदिराबाहेरच झालं शुभमंगल!

प्रेमाचा विषय असेल तर अनेक ठिकाणी धर्म, जात, रुढी, परंपरा या गोष्टी मागे पडलेल्या दिसून येतात. असाच काहीसा प्रकार बिहारमधील गया शहरामध्ये घडला आहे

16

नसरीन परवीन आणि अनंत कुमार या दोघांनी धर्माची बंधन झुगारून विवाह केला आहे. लॉकडाऊनमुळे मंदिरं बंद असल्याने या प्रेमीयुगुलाने मंदिराबाहेरच लग्न केलं.

26

गया येथील बहुआर चौरा मोहल्ल्यात दोघेजण राहतात. लॉकडाऊनमुळे खूप प्रयत्न करून त्यांनी मंदिराबाहेर पर्यंत भटजींना बोलावण्यात आणलं आणि हा छोटेखानी लग्नसोहळा पार पडला.

36

नसरीनच्या कुटुंबीयांना त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत माहित झालं होतं. परिणामी तिला मारझोड करण्यात आली असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे. तिला एका खोलीत देखील बंद करून ठेवण्यात आलं होतं.

46

नसरीन आणि अनंत या दोघांचे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून दोघांच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या. नसरीनला तिच्या कुटुंबाकडून होणारी मारहाण वाढल्यामुळे त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

56

अनंतने दिलेल्या माहितीनुसार त्याचे कुटुंबीय या लग्नानंतर खूश आहेत. मात्र मुलीचे पालक त्यांच्या नात्याच्या विरोधात होते आणि त्यामुळेच त्यांनी तिला मारहाण देखील केली होती.

66

एवढच नव्हे तर तिच्या घरच्यांनी तिला गोळी मारण्याची धमकी दिल्याची माहितीही अनंतने दिली आहे. त्यामुळे अगदी फिल्मी स्टाइलने गच्चीवरून उडी मारून नसरीन अनंतपर्यंत येऊन पोहोचली आणि त्यांनी लग्नगाठ बांधली.

  • FIRST PUBLISHED :