NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात; या कलाकारांना व्हायरसची लागण

सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात; या कलाकारांना व्हायरसची लागण

बॉलीवूड आणि टीव्हीमधील अनेक सेलिब्रिटींना (celebrity) कोरोनाव्हायरस (coronavirus) झाला आहे.

110

जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. भारतात आता कोरोना रुग्णांची संख्या इतकी आहे. सेलिब्रिटींनादेखील कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.

210

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाव्हायरसचं निदान झालं. त्यांनी शनिवारी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. (Image: Instagram)

310

अभिनेता अभिषेक बच्चनही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. त्याच्यावरदेखील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Image: Viral Bhayani)

410

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याचे कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आलेत, अशी माहिती मिळाली आहे. तर जया बच्चन, अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा आणि तिची दोन्ही मुलं अगस्त्या आणि नव्या कोरोना निगेटिव्ह आहेत. (Image: Instagram)

510

अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांची आई दुलारी खेर यांना कोरोनाची लागण झाली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र आपली टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती अनुपम यांनी आपल्या सोशल मीडियावर दिली.

610

‘कसौटी जिंदगी...' मालिकेतील मुख्य अभिनेता पार्थ समथानही कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे आणि इतर सर्वांचीदेखील टेस्ट केली जाणार आहे.

710

अभिनेते किरण कुमार यांनादेखील 14 मे रोजी कोरोनाचं निदान झालं. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षण नव्हती. दैनंदिन तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले तेव्हा त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यांनी घरातच स्वत:ला आसोलेट करून घेतलं आणि त्यांनी कोरोनावर मात केली. (Image: Instagram)

810

बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानी, तिचे वडील निर्माते करीम मोरानी आणि बहीण शझालादेखील कोरोनाची लागण झाली होती.

910

टीव्ही अभिनेत्री मोहिना कुमारी सिंहलाही कोरोना झाला होता. तिच्यावर सुरुवातीला दहा दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर घरी आयसोलेट करण्यात आलं. तीदेखील आता कोरोना निगेटिव्ह झाली आहे.

1010

भारतात सर्वात आधी कोणत्या सेलिब्रिटीला कोरोनाची लागण झाली तर ती म्हणजे गायिका कनिका कपूर. त्यानंतर तिनं चाहत्यांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :