NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / 'मला मृत्यू केव्हाही कवटाळू शकतो', कॅन्सरशी लढणाऱ्या इरफान खानने केलं होतं वक्तव्य

'मला मृत्यू केव्हाही कवटाळू शकतो', कॅन्सरशी लढणाऱ्या इरफान खानने केलं होतं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाल्याने इरफान अधिक खचला होता. इरफान खानचे चित्रपट, त्याचे सहज डायलॉग नक्कीच स्मरणात राहतील.

18

2020 या वर्षातील आणखी एक दु:खद बातमी म्हणजे हरहुन्नरी अभिनेता इरफान खान याचं आज वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं.

28

कोकिलाबेन रुग्णालयामध्ये इरफानने अखेरचा श्वास घेतला

38

इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. Colon Infection मुळे इरफानला मंगळवारी कोकिलाबेन रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं.

48

जवळपास वर्षभरापेक्षा जास्त वेळ त्याने या आजाराशी सामना केला आणि 2019 च्या सप्टेंबर महिन्यात इरफान भारतामध्ये परतला होता.

58

परतल्यावर अगदी ताज्या दमाने त्याने 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा देखील केला. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने हा चित्रपट कमर्शिअली हिट ठरला नाही. मात्र इरफानच्या जिद्दीचं कौतुक मात्र झालं.

68

त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे.

78

माझ्या या आजारामुळे मृत्यू मला कधीही कवटाळू शकतो असेही त्याने यावेळी म्हटले होते.

88

'पिकू', 'कारवाँ', 'हिंदी मीडियम', 'लंच बॉक्स' हे अलीकडच्या काळातील इरफानचे चित्रपट नक्कीच यादगार राहतील.

  • FIRST PUBLISHED :