NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / हवामानाची अचूक माहिती देणारी यंत्रं तुम्ही पाहिली आहेत का? पाहा Photos

हवामानाची अचूक माहिती देणारी यंत्रं तुम्ही पाहिली आहेत का? पाहा Photos

World Meteorological Day 2023 : हवामाचा अंदाज आपल्यापर्यंत अचूक पोहचवणारी यंत्र तुम्ही कधी पाहिली आहेत का?

  • -MIN READ

    Last Updated: March 23, 2023, 15:21 IST
19

जगभरात २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामान दिन’ म्हणून साजरा केला जातो. हवामानशास्त्रा बरोबरचं त्यात होणाऱ्या बदलांविषयी लोकांना जागरूक करणे हा त्यामागील हेतू आहे.

29

नागपुरातील प्रादेशिक मौसम विभाग केंद्राद्वारे आज जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून 'द फ्यूचर ऑफ वेदर, क्लाइमेट एंड वाटर अक्रॉस जेनरेशन' या थीमवर आधारित प्रयोगशाळेतील उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

39

हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक तसंच हवामानप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी दाखवण्यात आलेल्या प्रमुख उपकरणाची माहिती आपण पाहूया

49

व्हिआयपी किट : एखाद्या दुर्गम स्थळी अथवा एखाद्या आकस्मित प्रसंगी विमानाचे लँडिंग अथवा टेक ऑफ घेण्याची वेळ आल्यास या यंत्राचा उपयोग हवेतील गुणवत्ता, आद्रता, हवेतील तापमान, हवेची दिशा, गती इत्यादी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी या यंत्राचा उपयोग होत असतो.

59

अ‍ॅनिटोमीटर : या उपकरणाचा वापर हवा किंवा वाऱ्याचा वेग किंवा वेग मोजण्यासाठी केला जातो. प्रत्येक प्रकार हवेची गती शोधून आणि त्याचे व्होल्टेज, वारंवारता किंवा दाब बदल यासारख्या मोजण्यायोग्य सिग्नलमध्ये रूपांतर करुन कार्य करते.

69

या यंत्राला थर्मोग्राफ असे म्हणतात, या यंत्राचा वापर करून हवेतील तापमान प्रत्येक मिनिटाला, तासाला, दिवसाला किती आहे हे जाणून घेण्यासाठी या यंत्राची मदत होते. यावरील ग्राफ पेपरवर तापमान स्वयंचलित पद्धतीने अधोरेखित होत असते.

79

या यंत्राला सिंगल स्टीव्हनसन स्क्रीन असे म्हणतात. स्टीव्हनसन या शास्त्रज्ञांने या यंत्राचा शोध लावला त्यामुळे या यंत्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे.या यंत्रामुळे हवामानातील कमाल तापमान आणि किमान तापमान कळण्यास मदत होते.

89

हे स्वयंचलित वर्षामापक यंत्र आहे. या यंत्रातद्वारे पावसाचे मोजमाप स्वाचालित स्वरूपात केले जाते. प्रत्येक मिनिटाला, तासाला आणि दिवसाला किती पाऊस झाला याचे मोजमाप या यंत्राद्वारे केले जाते. यावर लावण्यात आलेल्या ग्राफ पेपरवर याचे मूल्यांकन स्वयंचलित पद्धतीने अधोरेखित होते.

99

स्वचलीत हवामान वेधशाळा असे या यंत्राचे नाव आहे. यामध्ये लावण्यात आलेल्या सेन्सर मुळे हवेतील आर्द्रता,हेवतीत दाब, हवेतील गती, हवेची दिशा ही माहिती स्वयंचलित पद्धतीने कळण्यास मदत होते. ही एकप्रकारे मनुष्य विरहित वेधशाळा आहे.

  • FIRST PUBLISHED :