अभिनेत्री कंगना रानावतच्या ऑफिसवर मुंबई पालिकेनं धडक कारवाई केली. कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यामुळे एकच खळबळ उडाली. पण, कंगनाने आपल्या ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट आहे.
ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी उभारण्यात आली.
ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना बांधण्यात आला.
कंगनाने आपल्या कार्यालयाच्या समोर अनधिकृतरित्या स्लॅबही उभारला.
कंगनाने आपल्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय उभारले.
देवघर आणि लिव्हिंग रुममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन तयार केले.
तळ मजल्यावर अनधिकृतरित्या किचन तयार केले.
स्टोअर रुमचे तर थेट किचनमध्ये रुपांतर केले होते.
एवढंच नाहीतर ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटचे ऑफिस केबिन बनवले.
ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर बेकायदेशीररित्या शौचालय उभारले.