मुंबई : महाराष्ट्रात उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. प्राणी पक्षी, बळीराजा आणि सगळे लोक मान्सूनची डोळ्यात तेल घालून वाट पाहात आहेत. या सगळ्यांसाठी खुशखबर आहे.
दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा कायम राहणार आहे. असं असलं तरी मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी स्थिती अनुकूल झाली आहे.
अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं जात आहे.
के एस होसाळीकर मान्सूनवर म्हणाले...
अरबी समुद्रात आज पहाटे चक्रीवादळ बिपरजॉय अजून तीव्र झालं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यालगच्या भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील २४ तासांत जवळपास उत्तरेकडे जाण्याची आणि अत्यंत SCS मध्ये तीव्र होण्याची शक्यता. त्यानंतर पुढील 3 दिवसात NNW सरकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.