मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा आहे. तिचा अफाट चाहतावर्ग आहे.
सोनाली कुलकर्णीने दुबईस्थित कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करत संसार थाटला आहे.
परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल की, लग्नापूर्वी सोनाली कुलकर्णीने एका व्यक्तीला डेट केलं आहे
नुकतंच अभिनेत्रीने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.
यावेळी सोनालीने सांगितलं की, कॉलेजमध्ये त्याला एक सिनिअर आवडत होता. तिला वाटायचं की तो तिला प्रपोज करेल.
परंतु त्याने केलंच नाही. शेवटी सोनालीने स्वतः पुढाकार घेत आपल्या सिनिअरला प्रपोज केलं होतं.
त्यानेसुद्धा सोनालीला होकार दिला होता. त्यांनतर तब्बल ५ वर्षे त्यांनी एकेमकांना डेट केलं आहे.
त्यांनतर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेत ब्रेकअप केला होता.
अभिनेत्री सांगते की, ते आपल्या आयुष्यातील सर्वात पहिलं सिरीयस रिलेशनशिप होतं.
सध्या अभिनेत्री कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करुन सुखाने आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहे.