दबंग सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सोनाक्षी सिन्हाचा आज वाढदिवस. बिहारच्या पटनामध्ये २ जून १९८७ मध्ये सोनाक्षीचा जन्म झाला होता.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षी फार जाड होती. ती जवळपास ९० किलोंची होती. सडपातळ होण्यासाठी तिने स्वतःवर मेहनतही घेतली. तिच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला कमावला होता. या सिनेमासाठी सोनाक्षीने तब्बल ३० किलो वजन कमी केलं होतं.
सिनेकरिअरला सुरुवात करण्यापूर्वी सोनाक्षीने कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम केलं आहे. २००५ मध्ये तिने मेरा दिल लेके देखो सिनेमासाठी कॉस्ट्यूम डिझाइन केलं होतं. सोनाक्षी तिच्या आई- वडिलांसाठी आजही कॉस्ट्यूम डिझाइन करते.
याशिवाय सोनाक्षीने २००८ ते २००९ मध्ये मॉडेल म्हणून रँप वॉकही केला होता. लॅक्मे फॅशन विकसाठी तिने रँप वॉक केला होता. सोनाक्षीला साड्या नेसायला फार आवडतं. याचमुळे ती अनेक सिनेमांमध्ये साडी नेसलेलीच दिसते.
लुटेरा सिनेमात सोनाक्षी सुंदर पेन्टिंग काढताना दाखवण्यात आली आहे. खऱ्या आयुष्यातही ती सुंद पेन्टिंग काढते. फावल्या वेळात तिला चित्र काढणं पसंत आहे.
दबंग सिनेमाच्या यशानंतर सोनाक्षी दबंग २ मध्येही दिसली होती. आता ती पुन्हा एकदा या सिनेमाच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणेच या भागातही ती सलमानची पत्नी दाखवण्यात आली आहे.