महाराष्ट्राला कोरोनाचा मोठा तडाखा बसला आहे. वाढत्या संक्रमणामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानं गरीबांना मदतीचा हात पुढे केला.
सलमानननं रविवारी राज्यातील तब्बल 5000 लोकांना अन्न आणि पाण्याचं वाटप केलं.
युवा सेनेचे सदस्य राहुल एन कानल यांनी सलमानचे अन्न वाटप करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत.
भाईजाननं केलेल्या या मदतीसाठी त्याची सर्वत्र स्तुती केली जाते. दरम्यान त्यानं अशीच लोकांची मदत करावी अशीही विनंती त्याला केली जात आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,160 नवे रुग्ण आढळले असून, 676 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 6 लाख 94 हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत.