NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Rule Change: उद्यापासून बदलणार या महत्त्वाच्या गोष्टी, तुमच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

Rule Change: उद्यापासून बदलणार या महत्त्वाच्या गोष्टी, तुमच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला सादर न केल्यास पेन्शनचे पैसे रोखता येतात. त्याचबरोबर गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे.

14

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. 2022 चा शेवटचा महिना डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. या महिन्यात अनेक नियम बदलत होत आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होईल. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपासून ते पेन्शनचे नियम बदलत आहेत. पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला सादर न केल्यास पेन्शनचे पैसे रोखता येतात. त्याचबरोबर गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे.

24

एलपीजीच्या किंमतीमध्ये होणार बदल एलपीजीची किंमत दर महिन्याच्या सुरुवातीला बदलते. गेल्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. यावेळी महागाई कमी झाल्याने गॅस सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात. यासोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीही कमी करता येतील.

34

लाईफ सर्टिफिकेट जमा करणं बंधनकारक 30 नोव्हेंबरपर्यंत ज्यांनी लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही त्यांना पेन्शन मिळणार नाही. अशा ग्राहकांचं मोठं नुकसान होणार आहे. या ग्राहकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने सर्टिफिकेट जमा करण्याची मुदत 30 नोव्हेंबर देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे.

44

ATM मधून पैसे काढणं होणार सेफ पंजाब नॅशनल बँकने आपल्या नियमात बदल केला आहे. पैसे काढण्यासाठी आता OTP आवश्यक असणार आहे. तुम्ही OTP अपलोड केला नाही पैसे काढता येणार नाही. फसवणूक रोखण्यासाठी PNB ने हा निर्णय घेतला आहे.

  • FIRST PUBLISHED :