NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Dapoli road accident : दापोलीतील भीषण अपघाताचे मन सुन्न करणारे PHOTO, मृतांची संख्या 8 वर

Dapoli road accident : दापोलीतील भीषण अपघाताचे मन सुन्न करणारे PHOTO, मृतांची संख्या 8 वर

Dapoli road accident : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

17

शिवाजी गोरे, प्रतिनिधी दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रात्री उशिरा उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला.

27

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत झालेल्या भीषण अपघातातील मृत्यांची संख्या ही ८ वर गेली आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचा तर एक गरोदर मातेचाही समावेश आहे.

37

खाजगी प्रवासी वाहतूक करणारी टाटाची मॅजिक गाडी दापोलीकडून हारणेकडे जात होती. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रक आणि टाटा मॅजिक गाडीची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की जागीच पाच जणांचा मृत्यू झाला.

47

यामध्ये कदम कुटुंबियातील दोन तर काजी कुटुंबीयातील दोन दोन व्यक्तीचा समावेश असल्याने कदम, काजी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,

57

मरियम गौफिक काझी (वय ६ वर्षे), स्वरा संदेश कदम (वय ८ वर्षे), संदेश कदम (वय ५५ वर्षे) आणि फराह तौफिक काझी (वय २७ वर्षे) सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग (वय ४५ वर्षे रा. हर्णै चालक) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

67

यामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षे) पाडले, वंदना चोगले (वय ३८ वर्षे) पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला शरय्या शिरगावकर वय 56.राहणार अडखळ डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

77

घटनास्थळी दापोली पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. या सगळ्या भीषण अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही दापोली पोलीसस्थानकात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या अपघातातील ट्रक चालक फैज रहिस खान यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे

  • FIRST PUBLISHED :