राजू श्रीवास्तव आता थोड्याच वेळात पंचतत्वात विलीन होणार आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या अखेरच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी त्यांचे मित्र, नातेवाईक आणि चाहते पोहोचले आहेत.
राजू श्रीवास्तव यांचे खास मित्र सुनील पाल आणि एहसान कुरेशीही काही वेळापूर्वी द्वारका येथील घरी पोहोचले होते.
राजू श्रीवास्तव यांच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मोठ्या संख्येने त्यांचे चाहते त्यांच्या अखेरच्या प्रवासात सहभागी होत आहेत.
राजू श्रीवास्तव यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे मित्र आणि चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने लोक आले असल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यावेळी त्यांचा जवळचा मित्र आणि कॉमेडियन सुनील पालने राजू यांना आपले गुरु असल्याचं सांगत त्यांच्याकडून फार काही शिकायला मिळाल्याचं म्हटलं आहे. एहसान कुरैशीसुद्धा उपस्थित होते.
राजू श्रीवास्तव यांचं पार्थिव निगमबोध घाटावर नेण्यात येत आहे. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.