NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Koyta Gang Terror In Pune : पाचसहा जण आले अन्..; पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, पाहा PHOTO

Koyta Gang Terror In Pune : पाचसहा जण आले अन्..; पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, पाहा PHOTO

Koyta Gang in Pune : पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे.

17

पुण्यातील कोयता गँगची दहशत अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील कोयता गँगचे लोण हळूहळू पसरत चालले आहे. नुकतेच शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन दहशत माजविली.

27

टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली. या प्रकरणी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवि ओरसे (वय 42, रा. जुनी वडारवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

37

ओरसे हे वडारवाडी भागातील गोलंदाज चौकात थांबले होते. त्या वेळी पाच ते सहा जण तेथे आले. त्यांच्याकडे दांडके आणि कोयते होते. टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली.

47

ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा, दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.

57

कायता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठी मोहीम उभारली होती.

67

यानंतर काही दिवस कोयता गँग शात झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा अशा घटना घडू लागल्या आहेत.

77

त्यामुळे पुणे पोलीस आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • FIRST PUBLISHED :