मयूरभंज: जगातील सर्वात विषारी प्रजातीमध्ये कोब्रा सापाचा समावेश होतो. कोब्राने एखाद्या व्यक्तीला सर्पदंश केला, तर पुढच्या काही क्षणातच त्या व्यक्तीचा जीव जातो. पण ओडीसातील मयूरभंज परिसरातील एका पेट्रोल पंपच्या नळीमध्ये कोब्रा जावून बसल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. या कोब्रा सापाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे बाहेर काढून जंगलात सोडलं आहे.
नॅशनल जिओग्राफीवरील माहीतीनुसार, किंग कोब्रा एखाद्या जीवावर हल्ला करताना आपल्या शरीराच्या लांबीपेक्षा तीनपट अधिक उंच झेप घेवून चावू शकतो. खरंतर कोब्रा साप माणसांपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करत असतो. तर तो नेहमी फना काढत श्वास घेतो.
किंग कोब्राची लांबी साधारण 18 फुटापर्यंत असू शकते, जे इतर सापांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. किंग कोब्रा हा प्रामुख्याने भारतातील पर्जन्यमान व सपाट प्रदेशात आढळतो. याशिवाय चीन, दक्षिण पूर्व आशियामध्येही किंग कोब्रा जास्त प्रमाणात आढळतो. कोब्रा सापांत प्रदेशानुसार विविध बदल आढळून येतात. इतर प्रजातींचे साप हे त्यांचं मुख्य अन्न असतं.