इंडिनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर आली आहे. हा उद्रेक इतका भयंकर होता की त्यानंतर जे घडलं ते अंगावर शहारे आणणारं होतं.
या उद्रेकानंतर सुमारे 5 किलोमीटरपर्यंत अंधार पसरला होता. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर काळ्या रंगाचे ढग आणि धुराचं साम्राज्य होतं.
ज्वालामुखीचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला आहे. संपूर्ण शेतात आणि रस्त्यांवर राख उडाल्याचं पाहायला मिळालं.
गाडीवरील राख पुसताना..
सुमात्रा बेटावर अनेक वर्षांपासून धुमसत असणाऱ्या ज्वालामुखीचा अखेर मोठा उद्रेक झाला. त्यामुळे आकाशात मोठ्या प्रमाणात राख आणि धूर पसरला
या उद्रेकानंतरची भयंकर दृश्यं समोर आली आहेत. साधारण 16, 400 फूट उंच धूर आणि काळ्या ढगांचं साम्राज्य पसरलं होतं.
साधारण ज्वालामुखीजवळच्या 5 किलोमीटर अंतरापर्यंत न जाण्याचं आवाहन स्थानिकांना प्रशासनाकडून कऱण्यात आलं आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर जवळपास 30 हजार स्थानिक लोकांना आपली घरं सोडावी लागली.
सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी या गावातील नागरिक आणि पशु-प्राण्यांसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. या उद्रेक किती भयंकर झाला असावा याचा अंदाज फोटोतून लावू शकतो.