विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 24 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात करणार आहे.
ऑकलंडमध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहली, केएल राहुल, मनिष पांडे, रविंद्र जडेजा हे जिममध्ये घाम गाळत आहेत. विराटने वर्कआउटनंतरचा फोटो शेअऱ केला आहे.
काही खेळाडू जिममध्ये फिटनेसकडे लक्ष देत असताना प्रशिक्षक रवी शास्त्री फिरण्यासाठी गेले आहेत. त्यांनी फोटो शेअर करताना म्हटलं की, आरामात श्वास घ्या.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसुद्धा फिरण्यासाठी गेला आहे. त्याने फोटोला कॅप्शन दिला की, शेवटी ऑकलंडला पोहोचलो.
कोणी फिरण्यात तर कोणी जिममध्ये असताना भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मात्र आराम करत आहे.
न्यूझीलंडविरुद्ध भारत 5 टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.