द जीक्यू १०० बेस्ट ड्रेस अवॉर्ड नुकतेच पार पडले. यावेळी बी- टाऊनमधील अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली होती. यावेळी करण जोहरने गुसीच्या आउटफिटला प्राधान्य दिलं. पूर्ण काळ्या रंगाच्या सूट त्याने घातला होता. यावेळी त्याने घातलेली ज्वेलरी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती.
कतरिना कैफला कॅमेऱ्यांचं लक्ष स्वतःकडे कसं वळवायचं हे चांगलंच माहीत असतं. बरगंडी रंगाच्या पॅन्ट सूटमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. कमीत कमी मेकअप आणि मेसी हेअरस्टाइलमुळे पूर्ण कार्यक्रमात फक्त लोकांचं तिच्यावरच लक्ष होतं.
यावेळी सगळ्यांचं लक्ष होतं ते फक्त लव्ह बर्ड सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्याकडे. दोघांनी पॅन्टसूटला प्राधान्य दिलं. पिच रंगाच्या आउटफिटमध्ये सोनम फार मादक दिसत होती. आनंदने करड्या रंगाच्या सूटला प्राधान्य दिलं.
दंगल गर्ल सान्या मल्होत्राने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. यावेळी तिने सिल्वर रंगाचे हिल्स घातले होते..
क्रिती सनॉने फाल्गुनी शेनचा पिकॉक आउटफिटला प्राधान्य दिलं. चंदेरी रंगाच्या या ड्रेसचं मुख्य आकर्षण हातावर केलेलं डिझाइन होतं. यावेळी तिने कमीत कमी मेकअप केली होती.
नुसरत भरूचाने यावेळी बिज रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता. ड्रेसला साजेसा तिने मेकअप केला होता.