तुम्ही शनिवारी बँकेत जायचं ठरवलं असेल तर तुमचा प्लॅन आजच रद्द करा. याचं कारण म्हणजे आता बँकांमध्ये शनिवारीही काम होणार नाही. 5 दिवस बँकेत काम होईल आणि 2 दिवस सुट्टी असणार आहे.
आता सरकारी बँका आठवड्यातून फक्त पाच दिवस काम करणार आहेत. सीएनबीसी आवाजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन बँकिंग असोसिएशनने आठवड्यातून 5 दिवस काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बँकांचं काम असेल तर ते ५ दिवसांमध्येच होणार आहे. 2 दिवस सुट्टी असणार आहे.
याआधीही बँक युनियन्सने या मुद्द्यावर आपसात एकमत केले आहे. देशातील सुमारे 8 लाख बँक कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
अर्थ मंत्रालय लवकरच बँकांमध्ये दोन दिवसांची सुट्टी आणि पाच कामकाजाचे दिवस मंजूर करू शकते. कर्मचार्यांच्या या मागणीला अर्थ मंत्रालयाचा कोणताही आक्षेप नाही.
इंडियन बँकिंग असोसिएशनने या मागणीबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानुसार, बँक कर्मचाऱ्यांचा दैनंदिन कामकाजाचा वेळ ४० मिनिटांनी वाढणार आहे.