NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / Gold Rate Today : दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 7 दिवसांत 2 हजारांनी स्वस्त झालं सोनं

Gold Rate Today : दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 7 दिवसांत 2 हजारांनी स्वस्त झालं सोनं

Gold rate today : लग्नासाठी दागिने खरेदी करण्याची संधी सोडू नका, पाहा किती स्वस्त मिळतंय सोनं

15

लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचे दर आठवड्याभरात दोन हजार रुपयांनी घसरले आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर घसरल्याने 22 कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत.

25

12 मे रोजी सोन्याचे दर जवळपास 62 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. 24 कॅरेट सोनं खरेदी करणं कठीण असल्याचं वाटत होतं. मात्र पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

35

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 61,190 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 56,090 रुपये झाले आहेत. मागच्या दोन दिवसात साडे सहाशे रुपयांनी स्वस्त झालं आहे.

45

22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर 5600 रुपये आहे. तर 8 ग्रॅम सोन्याचा दर ४४ हजार ८७२ रुपये आहे. एक ग्रॅम सोन्याच्या दरात काल आणि आज फार काही फरक झालेला दिसत नाही. मात्र 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याच्या दरात फरक पडला आहे.

55

येत्या काळात सोनं 65 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँका सोनं खरेदी करत आहेत. याशिवाय सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोनं खरेदीकडे वळत आहेत.

  • FIRST PUBLISHED :