NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / HBD: 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती दिशा पटानी; आज आहे कोट्यवधींची मालकीण

HBD: 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती दिशा पटानी; आज आहे कोट्यवधींची मालकीण

मुंबईत पळून आलेली दिशा पटानी कशी झाली बॉलिवूड अभिनेत्री?

111

दिशा पटानी ही आज बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. एका चॉकलेटच्या जाहिरातीतून करिअरची सुरुवात केलेल्या दिशाचे आज लाखो चाहते आहेत.

211

‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं होतं. अन् अत्यंत कमी वेळात तिनं सिनेसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.

311

दिशाचा आज वाढदिवस आहे. 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

411

दिशाला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. परंतु तिच्या कुटुंबीयांना ही आवड फारशी आवड नव्हती. त्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ती अभिनेत्री होण्यासाठी मुंबईत आली होती.

511

मुंबईत आली तेव्हा तिच्याकडे केवळ 500 रुपये होते. या 500 रुपयांत तिला स्वत:चा खर्च भागवायचा होता. कुटुंबीयांची नाराजी पत्करुन आल्यामुळं त्यांच्याकडून तिला कुठलीच आर्थिक मदत मिळत नव्हती.

611

करिअरच्या सुरुवातीस तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. एक लहानशी भूमिका मिळवण्यासाठी देखील तिला जागोजागी पायी फिरुन ऑडिशन्स द्यावी लागत होती.

711

दिशानं काही काळ मॉडलिंग देखील केलं होतं. ती सुंदर होती. त्यामुळं तिला एका चॉकलेटच्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. या जाहिरातीमुळं तिचं नशीब एकाएकी बदललं.

811

या जाहिरातीमुळं तिला लोफर या तेलुगु चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. अन् या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली.

911

लोफर हा चित्रपट फारसा चालला नाही. पण यामुळं दिशासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. तिला ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या बिग बजेट बॉलिवूडपटात काम करण्याची संधी मिळाली.

1011

अन् त्यानंतर ती बागी, मलंग, राधे यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटात झळकली. आज ती बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

1111

अन् त्यानंतर ती बागी, मलंग, राधे यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटात झळकली. आज ती बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

  • FIRST PUBLISHED :