मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती झालेल्या पळासनेर जवळच्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
तर 27 जणं जखमी झाले आहेत. सिमेंट फॅक्टरीसाठी लागणारी खळी घेऊन जाणारी ट्रॉली अनियंत्रित झाल्याने तो एका हॉटेलमध्ये घुसला.
महामार्गाची वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे. तसंच या भीषण अपघातामधील मृतांमध्ये सर्वाधिक मजुरांचा समावेश आहे.