NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / वर्दीतली माणसं! कोरोनाच्या संकटात लोकांसाठी देवदूत ठरतायत पोलीस, पाहा PHOTOS

वर्दीतली माणसं! कोरोनाच्या संकटात लोकांसाठी देवदूत ठरतायत पोलीस, पाहा PHOTOS

माणसांपासून मुक्या प्राण्यांपर्यंत सर्वांनाच कोरोनाच्या या संकटकाळात पोलीस मदत करत आहेत. वर्दीतल्या या माणसांच्या कार्याला सलाम.

17

देशात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस कर्मचारी मदत करत आहेत. त्यांची ही मदत माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून देते.

27

एका ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये चौकातच रिक्षा बंद पडल्याचं दिसलं. तेव्हा कंट्रोल रूमने तिथल्या पोलिसांना चौकशी करायला लावली. तर गर्भवती महिलेला दवाखान्यात नेताना रिक्षा बंद पडल्याचं समजलं. त्यावेळी पोलिसांनी स्वत:च्या गाडीतून महिलेला दवाखान्यात नेलं.

37

कर्नाटकात एक मदतीची हाक ऐकून पोलीस कर्मचाऱ्याने तब्बल 860 किमी अंतर स्कुटी चालवून कॅन्सरच्या रुग्णाला औषध पोहोचवलं.

47

रीवा इथं एका ठिकाणी बँकेतून पैसै काढायला आलेल्या वृद्ध दाम्पत्याला काहीच पैसे मिळाले नाहीत. तेव्हा भुकेल्या दाम्पत्याला डीएसपींनी जेवण आणि राशनही दिलं. त्यावेळी वृद्ध महिलेनं पोलिसांना आलिंगन दिलं.

57

उत्तर प्रदेशातील एक अनाथ महिलेला दवाखान्यात घेऊन जाण्यापासून ते तिच्या शेवटच्या श्वसापर्यंत तिची काळजी पोलिसांनी घेतली आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पार्थिवाला खांदाही पोलिसांनी दिला.

67

मध्यप्रदेशात कोणतंही वाहन उपलब्ध न झाल्यानं वृद्धाला हातगाडीवरून नेलं जात होतं. ते पाहताच पोलिसांनी त्या वृद्धाला गाडीतून दवाखान्यात नेलं.

77

माणसांना बोलता येतं म्हणून ते अडचणी सांगू शकतात पण मुक्या प्राण्यांचं काय? अशा प्राण्यांची भूक भागवताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे.

  • FIRST PUBLISHED :