शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून एवेंजर्स एण्डगेमचे शो सुरू झाले. मुंबईत प्रत्येक शो सध्या हाऊसफुल जात आहे. या आठवड्यात हॉलिवूडला टक्कर द्यायला बॉलिवूडचा दुसरा कोणताच सिनेमा नसल्यामुळे सध्या हॉलिवूडचाच बोलबाला बॉक्स ऑफिसवर दिसत आहे.
अनेक बॉलिवूड स्टार एवेंजर्सचे चाहते आहेत. त्यामुळे विकेण्डला टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, अनन्या पांडे, दिशा पाटनी, क्रिती सेनन आणि सुशांत सिंग राजपूत यांनी आवर्जुन हा सिनेमा पाहिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिती सेनन आपल्या बहिणीसोबत नुपुरसोबत सिनेमा पाहायला अर्ध्या तास आधीच पोहोचली होती. जेव्हा सुशांत आला त्याआधीपासूनच क्रिती आणि नुपूर आपल्या जागी बसल्या होत्या. त्यामुळे दोघांनी एकमेकांना पाहिलं नाही.
मात्र मध्यांतरात दोघं एकमेकांसमोर येतील असे वाटत होते. मात्र सुशांत वेळेच्या १५ मिनिटं आधीच थिएटरच्या बाहेर निघून गेला. सिनेमाचा महत्त्वाचा सीन सुरू होता तेव्हाच सुशांतने थिएटर सोडलं.
‘राब्ता’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. मात्र काही काळाने खासगी मतभेदांमुळे दोघांनी ब्रेकअप केलं.
वेगळं झाल्यापासून दोघांनी एकमेकांसोबत बोलणंही पूर्ण बंद केलं. सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सुशांतकडे सध्या ड्राइव, छिछोरे आणि दिल बेचारा हे सिनेमे आहेत तर क्रितीकडे अर्जुन पटियाला, हाउसफुल ४ आणि पानीपतसारखे सिनेमे आहेत.