कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरत असताना दोन वर्षांनी होळीचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूडपासून टीव्हीचे कलाकारही होळीच्या रंगात रंगले. मुंबईत हा रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी रंगांची उधळण करण्यासाठी होळी पार्टीचे (AnViki Rasleela) आयोजन केले होते. ज्यामध्ये अनेक टीव्ही स्टार्स सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन (Vicky Jain) यांची लग्नानंतरची पहिली होळी आहे. कपलने आयोजित केलेल्या Holi Bash मध्ये अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. दरम्यान या कलाकारांचे आणि या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य - विरल भयानी)
होळीच्या या पार्टीत अंकिता आणि विकी मॅचिंग व्हाइट आउटफिट्समध्ये दिसले. अंकिता पांढऱ्या साडीत सुंदर दिसत होती, तर विकी कुर्ता-पायजामामध्ये हँडसम दिसत होता. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
याशिवाय आणखी एका फोटोमध्ये हे कपल रंगामध्ये इतकं न्हाऊन निघालं होतं की त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे.. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
अंकिता-विक्कीच्या होली बॅशमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया (Divyanka Tripathi and Vivek Dahiya) हे कपल देखील धमाल करताना दिसून आलं (फोटो सौजन्य- विरल भयानी)
बिग बॉस फेम जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) देखील बॉयफ्रेंड अली गोनीसह (Aly Goni) या पार्टीत सहभागी झाली होती. (फोटो सौजन्य- विरल भयानी)
अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) याठिकाणी पती विक्रांत सिंह राजपूत ( Vikrant Singh Rajpoot) सह रंग खेळताना पाहायला मिळाली (फोटो सौजन्य- विरल भयानी)
'बिग बॉस-13' फेम आरती सिंह (Aarti Singh) तिची वहिनी अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmera Shah) हिच्यासह पोज देत या पार्टीमध्ये फोटोज क्लिक करत होती. जमकर (फोटो सौजन्य- विरल भयानी)
यावेळी अभिनेता जय भानुशाली देखील पत्नी अभिनेत्री माही वीज आणि मुलगी तारासह या पार्टीसाठी पोहोचला होता (फोटो सौजन्य- विरल भयानी)