NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / Vrindavan Flood Photos: श्रीकृष्ण नगरीत यमुनेचं 'रौद्र रूप'! वृंदावनात बुडाला जगप्रसिद्ध केशी घाट, पुराचे भीषण PHOTO

Vrindavan Flood Photos: श्रीकृष्ण नगरीत यमुनेचं 'रौद्र रूप'! वृंदावनात बुडाला जगप्रसिद्ध केशी घाट, पुराचे भीषण PHOTO

Vrindavan Flood Photos: श्रीकृष्णाच्या लाडकी यमुनेचे उग्र रूप वृंदावनात पाहायला मिळत आहे. पुराच्या पाण्याने अनेक जगप्रसिद्ध ठिकाणे व्यापली आहेत. वृंदावन, मथुरा, अनेक मोठे घाट आणि ब्रज मंदिरांसह यमुनेला लागून असलेला ब्रजचा संपूर्ण परिसर बुडताना दिसत आहे. वृंदावनातील केशी घाट आणि परिसरात याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे.

15

यमुना पुराचा सर्वात मोठा फटका वृंदावनच्या सर्वात प्रसिद्ध केशी घाटाला बसला आहे.

25

पूरस्थिती इतकी भीषण आहे की, केशी घाटावरील सर्व 25 पायऱ्या पाण्यात बुडाल्या आहेत. यासोबतच घाटाच्या वरच्या भागातही आता पाणी भरू लागले आहे.

35

सामान्य दिवसात या ठिकाणी लाखो भाविक केशी घाटावर माँ यमुना पूजनासाठी येत असत, मात्र पुरामुळे प्रशासनाने लोकांना येण्यावर बंदी घातली आहे.

45

हे ठिकाणही श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. असे मानले जाते की येथेच भगवान श्रीकृष्णाने केशी नावाच्या राक्षसाचा वध केला, त्यानंतर या ठिकाणाचे नाव केशी घाट पडले.

55

केशी घाट बुडाल्यानंतर येथील मंदिरेही रिकामी करण्यात येत आहेत. घाटातून यमुनापारपर्यंत कच्चा पूल होता तो तुटला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

  • FIRST PUBLISHED :