1/10 : नर्मदा सरोवर धरणाजवळ असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आज गुजरात राज्यातलं महत्त्वाचं आकर्षण बनला आहे. हा पुतळा 597 फूट उंचीचा आहे. अमेरिकेतल्या 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षाही हा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' उंच आहे.
2/10 : स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून परिचित असलेला थोर गणितज्ज्ञ रामानुजन यांचा पुतळा हैदराबादमध्ये आहे. त्याची उंची 216 फूट आहे.
3/10 : आंध्र प्रदेशमध्ये हनुमानाची 171 फूट उंचीची मूर्ती आहे.
4/10 : कर्नाटकमध्ये पंचमुखी हनुमानाची एक उंच मूर्ती तयार केलेली आहे. या मूर्तीची उंची 161 फूट आहे. उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण भारतात अनेक हनुमान भक्त आहेत. भारतात मारुतीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत. त्यापैकी पंचमुखी हनुमानाची मूर्ती अनेक मंदिरांमध्ये आढळते.
5/10 : दक्षिणेकडच्या तमिळनाडू राज्यातही मुरूगनस्वामींची 146 फुटांची मूर्ती आहे. तमीळ नागरिकांमध्ये मुरुगनस्वामी अर्थात कार्तिकेयाचे अनेक भक्त आहेत. पार्वती व शंकरांचे पहिले पुत्र व गणपतीचा भाऊ अशी कार्तिकेयाची ओळख आहे.
6/10 : माँ वैष्णोदेवीचे अनेक भक्त देशात आहेत. उत्तर प्रदेशातल्या वृंदावनमध्ये माँ वैष्णोदेवीची 141 फूट उंचीची मूर्ती आहे.
7/10 : आंध्र प्रदेशात विजयवाडा इथं वीर अभय अंजनेय हनुमानाची आणखी एक मूर्ती आहे. ही मूर्ती 135 फूट उंच आहे.
8/10 : तमिळनाडूत कन्याकुमारीला थिरुवल्लुवर यांचा 133 फूट उंचीचा पुतळा आहे. थिरुवल्लुवर हे एक प्रसिद्ध तमीळ कवी होते. कन्याकुमारी इथं समुद्रात काही अंतरावरच्या एका मोठ्या खडकावर हा पुतळा उभारण्यात आला आहे.
9/10 : सिक्कीम राज्यामध्ये गौतम बुद्धांचा एक सुंदर पुतळा आहे. तथागत त्साल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावंगळ इथल्या बुद्ध पार्कमध्ये हा पुतळा आहे. त्याची उंची 128 फूट आहे.
10/10 : हैदराबादमध्ये आणखी एक उंच पुतळा आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 125 फूट उंचीचा हा पुतळा अनेक पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे.