NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / लाखो-करोडो सिलेंडरपेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही 6 झाडं

लाखो-करोडो सिलेंडरपेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही 6 झाडं

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजनची (Oxygen) मोठी कमतरता आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जर ही 6 झाडं अधिकाधिक लावली गेली असती, तर देशात ऑक्सिजनची कमतरता भासली नसती. आधी झाडांपासून ऑक्सिजन मिळत होता, आता फॅक्टरीमध्ये याची निर्मिती करावी लागते. वेळेसह आधुनिक होणाऱ्या जगात झाडांची मोठी कत्तल केली गेली, त्याचाच परिणाम पर्यावरणात ऑक्सिजन कमतरता निर्माण झाली. जर जगात झाडचं नसतील, तर कितीही फॅक्टरी लावल्या, तरी ऑक्सिजन कमीच पडणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. जाणकारांनी झाडांबद्दल माहित देत, सर्वांनी जागरूक होऊन ही 6 झाडं लावण्याचं सांगितलं आहे.

16

कडुलिंब - कडुलिंबांचं झाडं अनेक औषधी गुणांनीयुक्त आहे. हे झाडं पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. हे एकप्रकारे नॅचरल प्यूरिफायरच आहे. वातावरणातील अशुद्धी साफ करुन हवेत ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम हे झाड करतं. कडुलिंबांचं झाड लावल्याने आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

26

जांभूळ - जांभळाचं झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुद्ध करतं. जांभळाच्या बियाही अतिशय फायदेशीर आहेत. हे झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही रिलीज करतं.

36

वड - वडाच्या झाडाला नॅशनल ट्री म्हटलं जातं. वडाच्या झाडाची महत्त्वाची बाब म्हणजे, हे झाडं किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं, हे त्याच्या सावलीवर अवलंबून असतं. म्हणजेच वडाचं झाडं जितकं मोठं असेल, तितका जास्त ऑक्सिजन मिळतो

46

अशोक - अशोकाचं झाडंही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करुन पर्यावरणात सोडतं. हे झाडं केवळ ऑक्सिजनचं प्रमाण वाढवत नाही, तर अशोकाचं झाड दुषित गॅसही शुद्ध करण्याचं काम करतं.

56

अर्जुन - अर्जुन वृक्षाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. यामुळे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो, तसंच पर्यावरणातील अशुद्ध वायूही शुद्ध करण्याचं काम हे झाड करतं.

66

पिंपळ - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाचं झाड इतर कोणत्याही झाडाच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करतं. हे झाड 60 ते 80 फुटांपर्यंत लांब असू शकतं. हे झाडं त्याच्या आयुष्यात इतका ऑक्सिजन तयार करतं, की एखादी फॅक्टरीही करू शकत नाही.

  • FIRST PUBLISHED :