NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / सासरच्यांनी विधवा सुनेचा पुन्हा लावला विवाह; कन्यादान करत भेट दिली कार, Photo व्हायरल

सासरच्यांनी विधवा सुनेचा पुन्हा लावला विवाह; कन्यादान करत भेट दिली कार, Photo व्हायरल

Saharanpur News: मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी सुनेला मुलीप्रमाणे सांभाळले. तिला पुन्हा लग्नासाठी तयार केले. सुनेने होकार दिल्यावर त्यांनी वराचा शोध घेतला आणि थाटामाटात पुन्हा लग्न केले.

15

सहारनपूरच्या सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंग यांनी समाजासमोर वेगळा आदर्श उभा केला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचा मोठ्या थाटामाटात पुनर्विवाह करून दिला. सिंग यांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न तर केलेच, पण मुलीप्रमाणे 'कन्यादान' करून तिची पाठवणी केली. या स्तुत्य निर्णयामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

25

सहारनपूरच्या बुडगाव शहरातील सावंत खेडी गावचे माजी प्रमुख जगपाल सिंह यांचा मुलगा शुभम राणा याचे लग्न 2021 मध्ये मेरठ जिल्ह्यातील सलावा गावात राहणाऱ्या मोनाशी झाले होते. मात्र, घरात लग्नाचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर शुभमने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूनंतर जगपाल सिंग यांचे दु:ख वाढले. त्यांना आपल्या सुनेच्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्यांनी सुनेला आपल्या मुलीचा दर्जा दिला आणि कुटुंबीयांशी चर्चा करून तिचा पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला.

35

याबाबत त्यांनी आपल्या सुनेचेही मत घेतले. सुनेने होकार दिल्यावर त्यांनी हरियाणातील गोलनी येथे राहणारा सागर याच्याशी आपल्या सुनेचे नाते निश्चित केले. सागरच्या कुटुंबासोबत पूर्वीपासूनच नातेसंबंध होते. नात्याने ते जगपाल सिंग यांचे भाचे आहेत. 4 डिसेंबर रोजी वऱ्हाडी आले आणि सराहानपूर शहरातील एका बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले.

45

सिंह यांनी आपल्या सूनेचे कन्यादान केलं आणि मुलीप्रमाणे तिची सासरी पाठवणी केली. तसेच सुनेला लाखो रुपयांची कार आणि वस्तू भेट म्हणून दिल्या.

55

जगपाल सिंह यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या सुनेला नेहमी मुलीसारखे वागवले आणि तिचे भविष्य पाहून तिचा पुनर्विवाह केले. त्यांनी पुढे सांगितले की त्यांचा भाचा सागर हा सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबातील आहे.

  • FIRST PUBLISHED :