जम्मू : जम्मू काश्मीरच्या पूंछ परिसरात पुन्हा एकदा भारतीय सैन्यदलाच्या जवानांना टार्गेट करण्यात आलं आहे.
जवानांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सतत दहशतवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत कुरघोडी सुरूच आहेत.
जवानांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सतत दहशतवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत कुरघोडी सुरूच आहेत.
सिद्रा आणि राजौरी भागात याआधी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. आता पूंछ भागात गाडीवर ग्रेनेड हल्ला केला आहे.
या ग्रेनेड हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला एवढा भयंकर होता की गाडी पूर्ण जळून खाक झाली.
या हल्ल्यानंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडीओ अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारे आहेत.
भारतीय लष्कराचे एक वाहन, भिंबर गली ते पूंछ दरम्यान जात असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.