कोरोनानंतर जगण्याची व्याख्या बदलली आहे. कोरोनाच्या महामारीनंतर भारतासह जगभरातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्यावर स्वत:च असं काही करण्याची वेळ आली. यातून काहीजण वाचले तर काहीजण पूर्णपणे उद्धवस्थ झाले.
दरम्यान अशीच एक घटना राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात घडली आहे. दोन भावांनी मिळून चहाचे दुकान टाकत बेरोजगारांना आदर्श घालून दिला आहे.
बाडमेरच्या छोट्याशा गावातील तरुणाने परदेशात आपली 1 लाखांची महिन्याची नोकरी सोडून बारमेरमध्ये चहाचा नवा स्टार्टअप सुरू केला आहे. ओमप्रकाश सौ एनआरआय आणि त्यांचा भाऊ नरेंद्र कुमार सौ या दोघांनीही पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
ओमप्रकाश 6 वर्षांपासून काँगो, आफ्रिकेत काम करत होता. तो तिथे महिन्याला एक लाख रुपये कमवत होता. 6 वर्षे काम केल्यानंतर त्याने आपल्या शहरात स्टार्टअप करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भावासोबत बारमेर जिल्ह्याच्या ठिकाणी 'ओम-नरेंद्र एनआरआय चायवाला' असे नाव देत दुकान टाकलं.
भावाच्या साथीने दुकान सांभाळत असून आतापर्यंत ते 8 जणांना रोजगार देऊ शकले आहेत. त्याचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. स्वत:च्या शहरात काहीतरी करावं, या विचाराने दोघांनाही व्यावसायासाठी त्यांनी प्रोत्साहीत केलं. दोघेही त्यांच्या चहाच्या दुकानाची फ्रेंचायझी देत आहेत.
यावेळी ओमप्रकाश म्हणाले की, आफ्रिकेत 6 वर्षे सेल्समन म्हणून काम केले. परंतु काही काळासाठी घरी आलो अन् बाडमेरमध्ये काहीतरी स्टार्टअप करण्याचा विचार केला. यातून OMNA NRI नावाचा चहाचा स्टार्टअप उघडला. आता महिन्याला सुमारे दीड लाख रुपये कमावल्याचे तो सांगतो.