NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / लॉकडाऊनमध्ये पार पडलं माजी पंतप्रधानांच्या नातवाचं लग्न, सरकारने सुरु केली चौकशी

लॉकडाऊनमध्ये पार पडलं माजी पंतप्रधानांच्या नातवाचं लग्न, सरकारने सुरु केली चौकशी

सध्या देशभरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी आपल्या मुलाचं लग्न हा कालावधीतच उरकून घेतले आहे.

17

शुक्रवारी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumarswamy) यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी (Nikhil Kumarswamy)चा विवाहसोहळा पार पडला. लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवत हा सोहळा आयोजित केल्याचा आरोप केला जात आहे.

27

निखिलचं लग्न कर्नाटकमधील काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री एम कृष्णप्पा यांची नात रेवती हिच्याबरोबर झालं. निखिलचे आजोबा म्हणजेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा देखील यावेळी उपस्थित होते.

37

निखिल आणि रेवतीचा विवाहसोहळा रामनगरमधील एका फार्महाऊसवर पार पडला. देशातील लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यासाठी या सोहळ्यासाठी केवळ 21 गाड्यांना परवानगी देण्यात आली होती

47

कुमारस्वामी यांनी दावा केला होता की, या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

57

यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करताना, आलेल्या पाहुण्यांना सोहळा पाहता यावा याकरता मोठ्या टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.

67

दरम्यान कर्नाटकमधील बीएस येडीयुरप्पा सरकारमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन न केल्यास योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

77

दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएन अश्वत्थनारायण यांनी रामनगरच्या डेप्यूटी कमिशनरकडून याप्रकरणाचा अहवाल मागवाला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी योग्य कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :