40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली आणि जे व्हायला नको होते तेच घडलं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ही धडक इतकी भयंकर होती की ट्रक उलटून बसच्या वर पडला. त्यामुळे बसचा पुरता चक्काचूर झाला.
या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तर ट्रक बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या भीषण अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये लखनऊ-गोरखपूर महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रक उलटा होऊन बसच्या वर पडला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.