NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / भारतातले 10 बदनाम 'रेड लाईट' एरिया, 3 तर महाराष्ट्रातीलच!

भारतातले 10 बदनाम 'रेड लाईट' एरिया, 3 तर महाराष्ट्रातीलच!

आजही भारतामध्ये अल्पवयीन आणि तरुण मुलींना मजबुरी म्हणून वेश्या व्यवसायात उतरावं लागत आहे, कायदे कडक असूनही मुलींना या व्यवसायामध्ये ओढलं जात आहे.

111

देह व्यापार आजही जगभरात महिलांच्या शरीर स्वातंत्र्यावर कलंक आहे. भारतासारख्या देशात स्त्रीला पूजनीय मानलं जातं, पण इथेही स्त्रीला बऱ्याच काळापासून शरीर विक्रीसारखा घृणास्पद प्रकाराला मजबूर व्हावं लागतं. 1956 साली पीटा कायद्याने वेश्यावृत्तीला कायदेशीर वैधता देण्यात आली, पण 1986 साली या कायद्यात संशोधन करून काही अटी जोडण्यात आल्या. यामध्ये सार्वजनिक सेक्सला अपराध मानलं गेलं, तसंच यामध्ये शिक्षेचं प्रावधानही टाकण्यात आलं. या कठोर कायद्यानंतरही देशात अजूनही अनेक महिला शरीरविक्री करण्यासाठी मजबूर आहेत. भारतात असे 10 रेड लाईट एरिया आहेत, ज्याची फक्त आशिया खंडातच नाही तर संपूर्ण जगात चर्चा होते.

211

बुधवार पेठ, पुणे : पुण्याची बुधवार पेठ देशातल्या सगळ्यात बदनाम रेड लाईट एरियामधली एक आहे. बुधवार पेठेत मोठ्या संख्येवर नेपाळी महिला देह व्यापारात संलिप्‍त आहेत.

311

गंगा-जमुना, नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या इतवारी भागात गंगा-जमुना परिसर आहे, जिकडे वेश्या व्यवसाय चालतो. हा संपूर्ण भाग नागपूरमध्ये बदनाम आहे. फक्त वेश्या व्यवसायच नाही तर इतर अनेक अपराधांचा अड्डा म्हणून हा भाग ओळखला जातो.

411

ग्वालियर : मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये रेशमपुरा नावाचा रेड लाईट एरिया आहे. या भागात देह व्यापार करण्यासाठी परदेशी मुलींसह मॉडेल्स आणि कॉलेजच्या मुलींसाठी ऑफिसच उघडली जात आहेत. इंटरनेट आणि मोबाईलवरून कॉलगर्ल्स बुक केल्या जातात, तसंच ईमेल किंवा मोबाईलवरून ग्राहकांना डिलिवरीचं ठिकाण सांगितलं जातं. कॉलगर्ल्सना कंत्राट किंवा पगारावर नोकरी दिली जाते.

511

मीरगंज, प्रयागराज : गंगा, युमना आणि सरस्वतीच्या त्रिवेणीमुळे प्रयागराज या तीर्थक्षेत्राला महत्त्व आहे. पण याच शहरात मीरगंज भागात 150 वर्षांपेक्षा जास्त जुना रेड लाईट एरिया आहे. इथल्या जुन्या इमारतींमध्ये लपलेल्या गल्ल्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. या भागात पाऊल टाकलं तरी घराबाहेर नटून थटून बसलेल्या महिला आजूबाजूने जाणाऱ्या पुरुषांना बोलावतात. या भागात आधी कोठे होते, जिकडे जुने जमीनदार मुजरा बघायला यायचे.

611

चतुरभूज स्थान, मुजफ्फरपूर : बिहारचा मुजफ्फरपूर भाग राज्यातल्या सगळ्यात मोठ्या रेड लाईट एरियापैकी एक आहे. उत्तर बिहारचा हा सगळ्यात मोठा वेश्या बाजार असल्याचं सांगितलं जातं.

711

शिवदासपूर, वाराणसी : जगातलं सगळ्यात प्राचीन शहर असलेलं वाराणसी हिंदूंचं सगळ्यात पवीत्र तीर्थक्षेत्र आहे, पण इकडेही देह व्यापाराचा इतिहास जुन्या गल्ल्यांमध्ये दिसतो. दालमंडी आणि शिवदासपूर सारख्या भागात अनेक वर्षांपासून देह विक्री केली जाते. शिवदासपूर भाग वाराणसी रेल्वे स्टेशनपासून 3 किमी लांब आहे, हा संपूर्ण भाग रेड लाईट एरिया म्हणून बदनाम आहे. अशाच प्रकारे दालमंडी भागही कायदेशीररित्या बंदी असूनही सर्रास सुरू आहे.

811

मेरठ कबाडी बाजार : पश्चिम उत्तर प्रदेशचं मोठं शहर असलेल्या मेरठमध्ये असलेला कबाडी बाजार खूप जुना रेड लाईट एरिया आहे. इंग्रज असल्यापासून इकडे वेश्या व्यवसाय चालतो. या भागात शरीर विक्री करण्यासाठी असलेल्या बहुतेक महिला नेपाळी आहेत.

911

जीबी रोड दिल्ली : भारताची राजधानी असलेल्या दिल्लीच्या जेबी रोडचं पूर्ण नाव गारस्टिन बास्टिन रोड आहे. दिल्लीमधला हा सगळ्यात मोठा रेड लाईट भाग आहे. या भागाचं नाव 1965 साली बदलून स्वामी श्रद्धानंद मार्ग करण्यात आलं. या भागाचाही स्वत:चा वेगळा इतिहास आहे. मुघल काळात या भागात एकूण 5 रेड लाईट एरिया म्हणजेच कोठे असायचे. इंग्रजांनी हे पाचही भाग एकत्र केले आणि याचं नाव जीबी रोड केलं. जीबी रोडवर सगळ्यात मोठा व्यापार होतो, असं सांगितलं जातं. इकडे नेपाळ आणि बांगलादेशमधून मुली तस्करी करून आणल्या जातात.

1011

कमाठीपुरा, मुंबई : फॅशन, फिल्म आणि बिजनेसचं शहर म्हणून मायानगरी मुंबईची ओळख आहे, याच शहरात कमाठीपुरा नावाचा जगातल्या सगळ्यात मोठ्या रेड लाईट एरियापैकी एक आहे. या भागाचा इतिहास 1795 चा आहे, जेव्हा जुन्या बॉम्बेचं निर्माण सुरू झालं. या भागाचं बांधकाम करण्यासाठी आलेल्या आंध्रा महिलांनी इकडे देह व्यापार सुरू केला, असं सांगितलं जातं. या भागात जवळपास 2 लाख सेक्स वर्करचं कुटुंब राहतं, असं सांगितलं जातं, जे आशियामधलं सगळ्यातम मोठं आहे.

1111

सोनागाछी, कोलकाता : भारताच्या पूर्वेकडील सगळ्यात मोठं महानगर सोनागाछी आशिया खंडातला सगळ्यात मोठा रेडलाईट एरिया मानला जातो. या भागातल्या इमारतींमध्ये जवळपास 11 हजार महिला वेश्या व्यवसाय करतात, असं सांगितलं जातं. उत्तर कोलकात्याच्या शोभा बाजार जवळ चित्तरंजन एवेन्यू भागात असलेल्या या बाजारात वेश्यांना लायसन्सही दिलं गेलं आहे. हा व्यवसाय बरेच समुह चालवतात, ज्यांना गँग म्हणलं जातं. एका अनुमानानुसार या भागात 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या जवळपास 12 हजार मुली सेक्स व्यापार करतात.

  • FIRST PUBLISHED :