NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / सिंहाची शिकार केल्याशिवाय प्यायच्या नाही पाणी, राणी दुर्गावतीबद्दल तुम्हाला माहितीये का?

सिंहाची शिकार केल्याशिवाय प्यायच्या नाही पाणी, राणी दुर्गावतीबद्दल तुम्हाला माहितीये का?

भारतातील महान राण्यांपैकी एक असणारी राणी दुर्गावतीचा बलिदान दिवस 24 जून रोजी साजरा केला जातो. गोंडवाना आणि महाकौशलचे लोक त्यांच्या मुलांना वीर राणी दुर्गावतीच्या शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाच्या गाथा सांगून प्रेरित करतात. तेव्हा अनुराग शुक्ला यांच्या माध्यमातून राणी दुर्गावतीशी संबंधित काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी जाणून घेऊया.

15

राणी दुर्गावती यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 रोजी भारतातील गोंडवाना राज्यातील कालिंजरचा राजा कीर्ती सिंह चंदेल यांच्या घरी झाला. दुर्गा अष्टमीला जन्म झाल्यामुळे तिचे नाव दुर्गावती ठेवण्यात आले. राजकुमारी लहानपणापासूनच धैर्य आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होती. तिच्यातील लढाऊ कौशल्य आणि थक्क करणारे व्यक्तिमत्व या गुणांमुळे तिची कीर्ती राज्यभर पसरली.

25

जबलपूरमधील राणी दुर्गावती संग्रहालयाचे हे स्वागतद्वार आहे. राणी दुर्गावतीचा विवाह चंदेलचा राजा संग्राम शाह याचा मुलगा दलपत शहा याच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या 4 वर्षांनी राजाचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्य संकटात सापडले. अशा वेळी राणी दुर्गावतीने राज्यकारभाराची सूत्रे स्वत:च्या हातात घेतली. जेव्हा बाज बहादूरने राणीवर वाईट नजर टाकली तेव्हा राणीने त्याला असा धडा शिकवला की तो परत आला नाही.

35

हा तो किल्ला आहे जिथे राणी राहायची. राज्यात कुठेही सिंह दिसल्याची बातमी मिळताच राणी त्याच्या शिकारीसाठी निघून जायची आणि शिकार करेपर्यंत ती पाणीही प्यायची नाही, अशी आख्यायिका आहे. राणीने आपल्या राज्यात आपल्या प्रजेसाठी अनेक विहिरी, तलाव, पायरी आणि धर्मशाळा बांधल्या होत्या.

45

जेव्हा दुर्गावतीने तिच्या राज्याचा विस्तार वेगाने सुरू केला तेव्हा रीवाचा शासक आसिफ खान याने अकबराला राणीशी युद्ध करण्यास प्रवृत्त केले. 1564 मध्ये अकबराने दुर्गावतीला पत्र पाठवून तिला अधीन राहण्यास सांगितले. पण राणीने तो प्रस्ताव नाकारला. अकबराच्या प्रचंड सैन्यासमोर आपले छोटेसे सैन्य घेऊन राणी दुष्मनांवर तुटून पडली.

55

युद्धादरम्यान, वीर दुर्गावती माँ दुर्गा बनून शत्रूंवर हल्ला करतात. या युद्धात लढत असताना तिने आपल्या प्रजेसाठी प्राणांची आहुती दिली. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी तिने बलिदान दिले. राणीला ज्या ठिकाणी वीरगती प्राप्त झाली होती, तिथे तिची समाधी बांधण्यात आली आहे. 1983 मध्ये राणीच्या सन्मानार्थ जबलपूर विद्यापीठाचे नाव बदलून राणी दुर्गावती विद्यापीठ असे करण्यात आले.

  • FIRST PUBLISHED :