ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. 5 ऑगस्टला बुधवारी मुख्य कार्यक्रम होणार आहे. यासाठी ही रामाची नगरी सज्ज झाली असून शहराचा कायापालटच झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार असून निवडक 200 लोकांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे.
अयोध्येतली मंदिरं आणि घाट लाखो दिव्यांनी प्रकाशून गेली असून लोकांनी दिपोत्सवाला सुरुवात केली आहे.
अनेक मंदिरांमध्ये दिपोत्सवालाही सुरुवात झाली असून मंदिरांवर रोशनाई करण्यात आली आहे.
अयोध्येतल्या शरयू नदीचा काठही सजविण्यात आला आहे. नदीवरही गंगा आरती होणार आहे.
तर अयोध्येतल्या 20 हजार मंदिरांची रंग रंगोटी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं लखनऊमधलं घर सजविण्यात आलं आहे.
आदित्यनाथ यांनी मंगळवारी रात्री आपल्या घरातच दिप प्रज्वलन केलं आणि आतषबाजीही केली.