पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी छापा मारत पाच स्पा सेंटर्समधून 25 तरुणी आणि 17 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. (PHOTOS: News18)
अधिकाऱ्यांना येथे अनैतिक कामं करण्याविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत तीन स्पा सेंटर चालकांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून काही आपत्तीजनक सामान जप्त करण्यात आलं आहे. (PHOTOS: News18)
हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (PHOTOS: News18)
या सेक्स रॅकेटविषयी एका एनजीओ पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांची एक स्पेशल टीम बनवून पारकर मॉलमध्ये छापा टाकत कारवाई करण्यात आली. (PHOTOS: News18)
मॉलमध्ये एका मागे एक अशा पाच स्पा सेंटर्समध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. (PHOTOS: News18)
हरियाणातील मॉलमध्ये आढळलेल्या अधिकतर तरुणी दिल्लीतील राहणाऱ्या असल्याची माहिती आहे. तर तरुण उत्तर प्रदेश आणि सोनीपत येथील रहिवासी आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. (PHOTOS: News18)
याआधीही काही दिवसांपूर्वी पोलिसांनी येथे, अनैतिक कामं सुरू असल्याचा खुलासा केला होता. मात्र आता अधिकाऱ्यांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. संध्याकाळच्या सुमारास एकाएकी झालेल्या या कारवाईमुळे पारकर मॉलमध्ये मोठी खळबळ उडाली. (PHOTOS: News18)