NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / PHOTOS: प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात राहुलला पाहून आधी बसला धक्का; मग घेऊ लागले सेल्फी; काय आहे प्रकरण?

PHOTOS: प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात राहुलला पाहून आधी बसला धक्का; मग घेऊ लागले सेल्फी; काय आहे प्रकरण?

जबलपूर, 12 जून : जबलपूरमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजवलं आहे. त्यांनी प्रथम नर्मदेच्या तीरावर गौरी घाटावर पूजा करून विजयासाठी आशीर्वाद घेतले. कार्यक्रमादरम्यान हजारो लोक प्रियंका गांधींना ऐकण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, कार्यक्रमात अचानक राहुल गांधींना पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

15

जबलपूरमध्ये प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात राहुल गांधींना पाहून लोकांना धक्का बसला. खरंतर भोपाळचे रहिवासी राकेश कुशवाह यांना या जाहीर सभेत पाहून लोक त्यांना राहुल गांधी समजू लागले. ते हुबेहूब राहुल गांधींसारखे दिसत होते.

25

राकेश यांचा चेहरा, केस आणि दाढी हुबेहूब राहुल गांधींसारखी दिसत आहे. त्यामुळे लोक त्यांना राहुल गांधींचा डुप्लिकेट म्हणून ओळखतात. त्यांना कार्यक्रमात पाहताच लोकांची सेल्फीसाठी झुंबड उडाली.

35

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी जबलपूरमध्ये आल्या होत्या. यादरम्यान राहुल गांधी यांच्यासारखे दिसणारे राकेश कुशवाहही कार्यक्रमात पोहोचले. ते लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

45

जेव्हा राकेश यांना राहुल गांधींप्रमाणे दाढी आणि केस ठेवण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, मी राहुल गांधींचा चाहता आहे. लोक अनेकदा त्यांना राहुल गांधी समजतात. अशा परिस्थितीत जेव्हा भारत जोडो यात्रा सुरू झाली, तेव्हापासूनच त्यांनी राहुल गांधींप्रमाणे दाढी वाढवण्यास सुरुवात केली.

55

राहुल गांधींसारखे दिसण्याचा अभिमान वाटतो, असे राकेश सांगतात. यासोबतच त्यांनी कार्यक्रमादरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

  • FIRST PUBLISHED :