पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले होते. आईच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनीमातृशक्ती योजनेचं उद्धघाटन केलं. त्याचबरोबर निरनिराळ्या 21 हजार कोटींच्या योजनांचा शुभारंभ केला.
या वयातही हिराबेन यांचं आरोग्य उत्तम (Healthy Life) होतं. त्या कोणत्याही आधाराविना चालू शकत होत्या. तसंच स्वतःची सर्व कामं करू शकत होत्या. सध्या त्या आपले धाकटे पुत्र पंकज यांच्यासोबत गांधीनगरमध्ये राहत होत्या.
हिराबेन मोदी याा घरातलं जेवणच घेत होत्या. खिचडी, वरण-भात असं साधं जेवण त्यांच्या आहारात असायचं. गोड पदार्थांमध्ये त्यांना लापशी खूप आवडत होतं. नरेंद्र मोदी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आईला भेटायला येतात, तेव्हाही खडीसाखर किंवा लापशीनंच त्यांचं तोंड गोड केलं जायचं.
अहमदाबादच्या एक आहारतज्ज्ञानं दिलेल्या माहितीनुसार हिराबेन यांनी शंभरीत प्रवेश केला असला, तरी त्या अजून निरोगी होत्या. सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा त्यांचं आरोग्य खूपच चांगलं होतं. त्या नेहमी घरातलं साधं जेवणच घ्यायच्या. हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
सहा महिन्यांपूर्वी गांधीनगरच्या महापालिका निवडणुकीवेळीही मतदान करण्यासाठी हिराबेन स्वतः शाळेपर्यंत गेल्या होत्या. इतकंच नाही, कोरोना महामारीच्या काळात लशीबाबत नागरिकांच्या मनात साशंकता असताना त्यांनी स्वतः लस घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता