काळी टोपी, स्टायलिश चष्मा, प्रिंटेड टी-शर्ट आणि खाकी रंगाचे हाफ जॅकेट घालून पंतप्रधान मोदी व्याघ्र प्रकल्पाच्या दौऱ्यावर पोहोचले.
प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्यातून अनेक छायाचित्रे येथे क्लिक केली.
यावेळी त्यांनी स्वत:च्या हाताने हत्तीला ऊस खाऊ घातला आणि दुर्बिणीच्या साहाय्याने दृश्यांचा आनंदही घेतला.
पंतप्रधान मोदींनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्तींच्या छावणीलाही भेट दिली.
हा तोच एलिफंट कॅम्प आहे जिथे ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्पर्स' चित्रपटातील रघू देखील राहतो. 'द एलिफंट व्हिस्पर्स' हा भारतातील पहिला डॉक्युमेंटरी आहे, ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. येथे पंतप्रधान मोदींनी बेली आणि बोमन या आदिवासी जोडप्याची भेट घेतली, ज्यांनी रघू या हत्तीच्या मुलाला वाढवले.
यानंतर पंतप्रधान मोदी इथून म्हैसूरला पोहोचले आणि प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी स्मरण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच व्याघ्र संवर्धनासाठी अमृत कालचे व्हिजन आणि स्मारक नाणेही त्यांनी जारी केले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी 2022ची व्याघ्रगणना प्रसिद्ध केली. यावेळी, वाघांची संख्या 3167 झाली असल्याचे सांगण्यात आले. 2018 च्या जनगणनेमध्ये वाघांची संख्या 2,967 असल्याचे सांगण्यात आले होते. यापूर्वी ही संख्या 2014 मध्ये 2226, 2010 मध्ये 1706 आणि 2006 मध्ये 1411 होती.