कच्छमधील रापरमध्ये गीता रबारीच्या लोक डायरामध्ये 4 कोटी 50 लाख रुपये जमा झाले. लोक डायरामध्ये गीता रबारी यांनी रात्रभर गीत सादर केले. गीता रबारी यांना कच्छची कोकिळा म्हणून ओळखले जाते. या कार्यक्रमात लोक हातात नोटांचे बंडल घेऊन आले आणि त्यांनी गीता रबारी यांच्यावर करोडोच्या नोटांचा वर्षाव केला.
काही दिवसांपूर्वी गीता रबारी यांचा कार्यक्रम चर्चेत आला होता. बनासकांठा येथील थराद येथे नानदेवी माता वाव आणि नवचंडी यज्ञाच्या पुन: प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बनासकांठामध्येही गुजरातची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीता रबारी यांच्या या कार्यक्रमात लोकांनी कोट्यवधी रुपये उडवले.
गीता रबारी यांचा जन्म कच्छ जिल्ह्यातील टप्पर गावात झाला होता. त्या इयत्ता पाचवीत शिकत होत्या, तेव्हापासून त्या गायला लागल्या.
गीता रबारी यांचा जन्म कच्छ जिल्ह्यातील टप्पर गावात झाला होता. त्या इयत्ता पाचवीत शिकत होत्या, तेव्हापासून त्या गायला लागल्या.
गीता रबारी भजन, लोकगीते सादर करतात. गीता रबारी यांची अनेक गुजराती गाणी प्रसिद्ध आहेत.