अहमदाबाद : ट्रक आणि थार गाडीचा भीषण अपघात झाला. त्याच वेळी तिथे 120 स्पीडने येणाऱ्या गाडीनं काही लोकांना चिरडलं आणि आपल्यासोबत फरफटत नेल्याची घटना समोर आली आहे.
या भीषण अपघाताचे फोटो समोर आले असून अत्यंत दुर्दैवी आणि भयंकर आहे. या अपघातात २ पोलिसांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ९ जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
कारचा स्पीड 120 होता, अचानक नियंत्रण सुटलं आणि समोर असलेल्या लोकांना फरफटत घेऊन गेली. यामध्ये कार चालकही जखमी झाला आहे. ओव्हर स्पीडमुळे मोठं नुकसान झालं आहे.
या प्रकरणी पोलीस चौकशी करत असून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदनगर इथे इस्कॉन ब्रिजवर घडल्याची माहिती मिळाली आहे.